तुमचा मोबाईल तुम्हाला संपवतो आहे

 

📵📵 तुमचा मोबाईल तुम्हाला संपवतो आहे 📵📵

               😱😱😱😱😱😱

ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण थोडा वेळ काढून नक्की वाचाच.


📵📵आठवा पाहू किती दिवस झाले तुम्ही किमान २४ तास मोबाईल पासून दूर राहून? एक दिवस मोबाईल पूर्णपणे बंद केला तर काहीही बिघडत नाही यावर तुमचा विश्वास आहे का? 📵📵


📵📵घड्याळ, कॅल्क्युलेटर, पासबुक, डायरी, टिव्ही सगळं मोबाईल ने हिरावून घेतलंय. आपली मुलं सुद्धा हिरावून घेतली आहेत. जी पप्पा आणि मम्मी मोबाईल मध्ये डोकावून बसतात तेव्हा केविलवाणे होऊन आपल्या कडे काहीतरी सांगत असतात, आणि आपण ते नीटसं ऐकूनही घेत नसतो. त्यांच्या ही हातात एखाद टॅब किंवा स्मार्टफोन दिलेला असतो.📵📵


📵📵जेव्हापासून आपण स्मार्ट फोन घेतला तेव्हापासून आपण स्मार्ट झालोत की मूर्ख होत आहोत? 📵📵


📵📵कोणतीही ॲप बनवणारी कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कसं गुंतवून ठेवता येईल यावर यशस्वी होत असते. त्यांचं अर्थकारण यावर चालत असतं. आपण कामासाठी कितीवेळ मोबाईल वापरतो आणि टाईमपास म्हणून किती वेळ वापरतो? एका नोटिफिकेशन ने आपला किती वेळ घालवला हे तुम्हाला कधी लक्षात आलं आहे का? असं कितीवेळा झालं आहे की आपल्याला एक काम करायचं होतं मोबाईल वर आणि नेमकं तेवढं काम सोडून आपण अर्धा तास चाळतच बसलेलो राहिलो.📵📵


📵📵सकाळी सकाळी उठल्यावर किती जण मोबाईल ला हात न लावता आपली पहाटेची कामे पूर्ण करतात? आपल्याला व्यसन लागलं आहे मोबाईलचे हे आपण मान्य करत नाही आहोत. आपल्या आयुष्यातला कितीतरी मौल्यवान वेळ आपण काहीतरी उपयुक्त, अर्थपूर्ण करायला घालवू इच्छिता का? 📵📵


📵📵आपली स्वप्न, इच्छा, आकांक्षा यांची पूर्तता करू इच्छिता का? तर चला मग माझ्या सोबत आपण आपल्या आयुष्याचे नियंत्रण परत स्वतःकडे घेऊया. 📵📵


काय करता येईल?🌺🌺


🌷🌷१) डायरी आणि पेन विकत घ्या. (मोबाईल मध्ये कितीही उपलब्ध असले तरीही प्लीज एवढं कराच.)

२) कामांची यादी, प्लॅन ची यादी, मनातल्या स्वप्नांची यादी (बकेट लिस्ट) बनवा.🌷🌷

🌹🌹३) मोबाईल ची notification बंद करा. काहीही तुमच्या आयुष्या एवढं महत्त्वाचं नसतं. तुम्ही मोबाईल साठी नाही, मोबाईल तुमच्या साठी आहे.🌹🌹

४) किमान २-४ असे ॲप नक्कीच आहेत ज्याची तुम्हाला गरज नाही, त्याला उडवा. शुभेच्छा द्यायच्या आहेत ना, शब्दात लिहून पाठवा, शक्य असेल तर एक मिनिटांचा कॉल किंवा टेक्स्ट मेसेज करा.📵📵

५) छोटी छोटी उद्दिष्ट पूर्ण करा. उदा. पुस्तकाचे किमान एक पान रोज वाचा. किमान चार ओळी वहीवर लिहा. आपला एक छंद जोपासा….याप्रमाणे एक छोटी गोष्ट पूर्ण करा.

६) सुट्टीच्या दिवशी काही तासांसाठी स्विच ऑफ करून ठेवा. 

७) रात्र झाली तर इंटरनेट बंद करून ठेवा, स्क्रीन उलटी करून ठेवा. कितीही हात शिवशिवले तरीही तरी रात्रीच्या एका विशिष्ट वेळा नंतर मोबाईल हातात घेऊ नका.📵📵


मनोरंजन केवळ मोबाईल मध्येच आहे का?

📵📵घरात कुटुंबातील सदस्यांशी बोलणे, टीव्ही वर एकत्रित काही कार्यक्रम बघणे, फिरायला बाहेर पडणे, आवडीचे काम करणे यातही मनोरंजन आहेच ना? मोबाईल मधले मनोरंजन आभासी आहे, त्यामुळे ते वास्तविक मनोरंजन न देता आभासी मनोरंजन देत असतं. 📵📵


मोबाईल आणि कामे

📵📵आज बहुतांशी कामे ऑनलाईन झाली, कोरोनामुळे हे अवलंबित्व अधिकच प्रमाणात वाढलं. सतत नव्याने येणारी कामे किंवा सूचना यामुळे आपल्याला खूपवेळा मोबाईलचा सतत चाळा लागलेला असतो. याला पूर्णपणे थांबवणं शक्य नसलं तरी प्रत्येक पाच पाच मिनिटाला काहीतरी महत्त्वाचं येत नसतं हेही तेवढंच खरं आहे. त्यामुळे ही अस्वस्थता प्रयत्नपूर्वक टाळली पाहिजे.📵📵


मोबाईल बाबत काही शिष्टाचार

१) समोर एखादी व्यक्ती किंवा मित्र, नातेवाईक बसलेला असताना किमान आपण मोबाईल मध्ये कॉल, मेसेज किंवा गेम खेळत बसणे हे कमालीचे अपमानकारक असते. त्याला इग्नोर केल्याची भावना त्यातून निर्माण होते. त्यामुळे हातात मोबाईल घेऊ नका, किंवा excuse me असे म्हणून किंवा तशी कल्पना देऊन अगदी थोडक्यात आपलं काम करून मोबाईल बाजूला ठेवावा.

२) जेवण करताना मोबाईल बघत जेवण्याने चव ही कळत नाही, आणि तोंडात पुरेशी लाळ ही बनत नाही.

३) मोबाईलची स्क्रीन सगळ्यात जास्त जंतूनी भरलेली असते, त्यामुळे खाताना स्क्रीन ला हात नकोच, वेळोवेळी स्वच्छ कपड्याने sanitise करून घेतली पाहिजे.

४) कौटुंबिक बैठकीत, मीटिंग किंवा महत्वाच्या कामात सायलेंट करून ठेवणे. कॉल आलाच तर शक्य झाल्यास मेसेज करून तसे कळवणे. अगदीच नाईलाज असेल तर किमान बाहेर पडून थोडक्यात बोलून परत येणे.

५) खूपवेळा तुम्ही समोरच्या व्यक्तीचे बोलणे ऐकत असता, पण डोकं मोबाईल मध्ये खुपसून असता, डोळ्यांचा एकमेकांशी संपर्क नसल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनात नाराजी निर्माण होऊ शकते.📵📵


शेवटी काय तर📵📵

मोबाईल हा जगण्याचा भाग आहे, जीवन नाही. आपल्याला मिळालेलं आयुष्य आणि त्यातला वेळ फार मोजकाच आहे. त्याला आपण सो कॉल्ड स्मार्ट फोनला उगाच दान नाही ना करू शकत. बघा करा विचार. यातून वाचलेला वेळ कसा सत्कारणी लावता येईल बघुया.

          🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✨🌺✨ जीवळेरो चित्रपट ✨🌺✨

आजची सुंदर सुविचार आयुष्यावर सुंदर विचार ...

👮👮भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 458 जागांसाठी भरती 👮👮

🙏सख्खं नातं सतत का देतं दुःख🙏

विचार : ताकद आणि पैसा...

Life मधे जे करायचं आहे ते मनातून करा ..

*आई मुलाला कडेवर का घेते

म्हणुन तर मैत्री

_विश्वास_

Great 👌 Marathi Suvichar