गाठी ऋणानुबंधाच्या काळजीपुर्वक सांभाळा...




🌺🌺 *गाठी ऋणानुबंधाच्या काळजीपुर्वक सांभाळा अन्यथा तडा जाईल.....*🌺🌺


🌹🌹*समाजात, दैनंदिन जीवनात वावरत असताना किंवा समाज माध्यमातून अनेकांची ओळख होत असते. त्यापैकी काही ओळखी कालांतराने विरल्या जातात तर काही पुढे जाऊन एकदम घट्ट होतात. अगदी गाठी बसतात अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही. ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं आणि सुख दुःख देखील वाटली जातात. मदतीची देवाण कारण समजवण्यासाठी नेहमी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो...!!!*🌹🌹


🌷🌷*जीवनातील वास्तव समजणे अवघड नाही, फक्त ज्या तराजुमध्ये दुस-यांना "तोलता" त्याच तराजुमध्ये "स्वतः" बसुन बघा, तेव्हा स्वतःचे वास्तव समजेल...!!!*🌷🌷


💐💐*दुसऱ्याचे चांगले वाईट कानाने ऐकलं तर फक्त शब्दांचा आवाज येतो परंतु मनाने ऐकलं तर शब्दांचा अर्थ समजतो...!!!*💐💐


🌺🌺*देवाण घेवाण होते. थोडक्यात काय तर एक नवं हक्काचं व्यासपीठ उपलब्ध होत आणि ऋणानुबंध जुळतात...*

🎶🎶*दैनंदिन जीवनात चिंता क्लेश, व्यथा नसतात कुणाला ? प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणात त्या असतातच. म्हणून केवळ आपलंच घेऊन बसलो किंवा दरवेळी आपलंच रडगाणं ऐकवत बसलो तर मात्र समोरचा शेवटी कंटाळतो. मग तो आपल्याला टाळू लागतो किंवा फिरकी घेतो. तसही घडता काम नये. आधारासाठी खांदा जरूर वापरावा पण तो निकामी करू नये इतकंच. संवाद हा नेहमी परस्पर विचारांचा असायला हवा, एकतर्फी नसावा इतकंच..*💚💚💚


✨✨✨*मुळात तुम्ही दुःखी आहात याच कुणालाही आणि कसलंही सोयरसुतक पडलेलं नसतं. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाला विवंचना असतातच. फक्त त्यांचं स्वरूप भिन्न असतं. कुणी व्यक्त होतो तर कुणी फक्त कुढत बसतो. दुःखाच भांडवल करून सांत्वनाची अपेक्षा सतत बाळगणं चुकीचं ठरेल, नाही का ??..*✨✨✨


🌍🌍*या जगात अमरत्व कुणालाही प्राप्त झालेल नाही. फरक इतकाच की मानवाने कितीही प्रगती केली असली तरी देखील जन्म आणि मृत्यूवर आपण आजमितीस विजय मिळवू शकलो नाही. असंख्य महामानव जन्माला आले आणि लयाला देखील गेले. शिल्लक राहतं ते केलेलं काम, जपलेले ऋणानुबंध...*🌍🌍


🌺🌺*ऋणानुबंधाच्या गाठी सहजरित्या नाही बांधल्या जात. त्यासाठी दोन पावलं आपणही पुढं यावं लागतं. थोडा वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारला आणि माणुसकी जपली की जीवन सोपं होवून जातं. देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे असं प्रत्येक वेळी होत नाही. कधी तरी हात सैल सोडावा म्हणजे समतोल साधला जातो...*🌺🌺


🌷🌷*ओळख, परिचय, मैत्री, स्नेह, प्रेम, नातं या सर्वसाधारण पायऱ्या असतात. यामधील एखादी पायरी जरी वगळली तरी बनलेलं नात डळमळीत होतं किंवा नात मुरण्यापूर्वी तुटण्याची शक्यता अधिक राहते. चांगले मित्र/मैत्रिणी कधीही हक्क दाखवत नाहीत कारण जेथे व्यथा हक्क दाखवला जातो तेथून अशा नात्याला ग्रहण लागतं...*🌷🌷


💐💐*एकमेकांच्या आवडी निवडी जपणं, समजून घेणं, चूक झाली तरी मोठं मन ठेवून माफ करणं, गृहीत न धरणं, प्रत्येक वेळेस आपणच कसे बरोबर आहोत हा गैरसमज दूर ठेवणं आणि जमलंच तर त्यागाची तयारी ठेवणं एव्हढं जरी केलं तरी ऋणानुबंध चिरंतन राहण्यास मदतच होते.*💐💐


🤞🤞*खेळ, स्पर्धा, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, प्रवास, रहाण्याच ठिकाण, परिसर यामधून असंख्य लोक आपल्याशी निगडित असतात. कधी ओळख होते तर कधी जाणीवपूर्वक करून घेतली जाते. कोण कुणाला कधी आवडेल आणि का आवडेल याला ना वयाचं बंधन असतं ना लिंगाच..! दोन्हीकडून निस्वार्थी ऋणानुबंध असेल तर तो नक्कीच दृढ होतो पण स्वार्थ असेल तर स्वार्थ सरल्यानंतर मात्र दूर ढकललं जात.*🤞🤞


🌹🌹*ऋणानुबंध टिकवून ठेवण्यासाठी ते फुलविण्यासाठी कधी तरी पदराला झीज देखील सोसावी लागते, वेळ द्यावा लागतो. मात्र अनाठायी अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंगाच दुःख वाट्याला येतं. निरपेक्ष नात अधिक श्रेष्ठ ठरतं. दुसऱ्याच्या सुखात सुख मानता आलं की मोक्षप्राप्तीसाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत, अस माझं प्रांजळ मत आहे...*🌹🌹


🌺🌺*ऋणानुबंधाचे धागे जितके रेशमी आणि तरल भावनेने विणलेले असतील तितकीच त्यांची शिवण घट्ट बसली जाते. असे ऋणानुबंध आपलं जीवन सुगंधित करतात. त्यांचा सुवास कस्तुरी मृगासारखा असतो. स्वतःला कळत नाही पण जो जवळून अनुभवतो, त्याना हा सुगंध मन मोहून टाकतो. असे ऋणानुबंध जपावे लागतात. त्यांना नजर लागू नये, ते विखरू नयेत यासाठी सर्वतोपरी काळजी घ्यावीच लागते हे मात्र नक्की..*💐💐


🌷🌷*परस्परांची काळजी जाणीवपूर्वक घेणं, कुठेही असलो तरी हळूच दिनचर्या कानी घालणं, आवर्जून चौकशी करण, मदतीचा हात स्वतःहून पुढे करणं, जिवलगांच्या कार्यात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवण, सुख दुःखाच्या प्रसंगात वेळ काढून उपस्थित नोंदविण ही कार्य दिसायला जरी छोटी दिसत असली तरी देखील त्यामागची भावना खूप मोठी असते. यामुळे ऋणानुबंधाचे रंग फिके न पडता अधिकच गडद होतात.*🌷🌷


✨✨✨*काऊंटर, खुर्ची, प्रवासातील नेहमीचा डब्बा, स्टेशन, ऑफिस, भाड्याची रूम, भाड्याची जुनी सायकल, बाईक, देवळाचा कट्टा, कॉलेजमधील विहिरीच बकुळ, भेंडीच झाड, एसटी स्टँड, समुद्र किनाऱ्यावरील रचलेला दगडी बांध, गार्डन मधील बाक, शाळेतील पळून जाण्यास मदत करणारी खिडकी, चुलीच भान, शेणाने सारवलेलं अंगण, शेतातील खळ, पशु, पक्षी, झाडं, तळ, विहीर या चरचरातील प्रत्येक घटकांशी ऋणानुबंधाचे सूर जुळलेले असतात आणि आयुष्यभर ते तसेच कायम छेडले जातात...*✨✨✨


🌺🌺*काच आणि ऋणानुबंध यांच्यात खूपच साम्य आढळून येत. अविश्वासाने, फसवणुकीने दुरावलेले ऋणानुबंध तडलेल्या काचेसारखे असतात. त्यांना पुन्हा सांधणं शक्य होत नाही.*🌷🌷🌺 


💐💐*मनातून उतरलेल्या व्यक्तीच अस्तित्व जरी आपण मान्य करत असलो तरी ती व्यक्ती आपल्या मनातील स्थान कायमच गमावून बसते.....!*💐💐


🌷🌷*परमेश्वराने दिलेलं हे जीवन खूपच सुंदर आहे. मानव जन्म पुन्हा पुन्हा नाही मिळत. प्रत्येक क्षणाचा उपभोग नक्कीच घ्यायला हवा. जमेल तेथे आणि जमतील तसे निस्वार्थी ऋणानुबंधाचे धागे विणायला काहीच हरकत नसावी. हेतू प्रामाणिक असेल, नात स्वछ आणि पारदर्शक असेल तर सदसदविवेक बुद्धीला जे योग्य वाटेल अशी कृती करायला काहीच हरकत नसावी. या ईह लोकीचा निरोप घेण्यापूर्वी प्रेम वाटायला आणि नशिबाने लाभलेलं प्रेम स्वीकारायला वाट का पहायची ?? शेवटी काय, जपलेल्या ऋणानुबंधाच्या अविस्मरणीय स्मृती इतरांच्या मनात ठेवून निरोप घ्यायला देखील भाग्य लागत मित्रहो.*🌷🌷


🌷🌷*सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. खोट्या राजकारणी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*💐💐


🌺🌺*"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...❤️❤️❤️

                       🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

✨🌺✨ जीवळेरो चित्रपट ✨🌺✨

आजची सुंदर सुविचार आयुष्यावर सुंदर विचार ...

👮👮भारतीय लष्कराच्या ASC सेंटर मध्ये 458 जागांसाठी भरती 👮👮

🙏सख्खं नातं सतत का देतं दुःख🙏

विचार : ताकद आणि पैसा...

Life मधे जे करायचं आहे ते मनातून करा ..

*आई मुलाला कडेवर का घेते

म्हणुन तर मैत्री

_विश्वास_

Great 👌 Marathi Suvichar